Sharad Pawar

याबाबत माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना काल तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. परंतु शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    याबाबत माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.

    तर शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितले की, काही चाचण्या घेतल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली.