rajesh tope

वेळ पडल्यास लॉकडाऊनचा पर्याय नाईलाजाने का होईना पण अंमलात आणावा लागेल, असे संकेत टोपेंनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

    मुंबई: लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही. पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

    वेळ पडल्यास लॉकडाऊनचा पर्याय नाईलाजाने का होईना पण अंमलात आणावा लागेल, असे संकेत टोपेंनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

    राज्यात दररोज ३५ ते ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असेल तर तशी बेडसची व्यवस्था आहे का, हे पाहावं लागेल. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागेल, असेही टोपे यांनी म्हटलं आहे.