
आज सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना,युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला सक्षम बोलणारे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे मी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, असं युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी सांगितले.
मुंबई : नाशिक शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या नवीन नियमावलीना कंटाळून विधान भवन समोर युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
दरम्यान आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना,युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला सक्षम बोलणारे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे मी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, असं युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पुतणे सराईत गुन्हेगार अजय बागुल हे सत्ताधारी पक्षात असल्यामुळे नाशिक शहराच्या पोलिस आयुक्तांकडून वारंवार करण्यात आलेला बचावामुळे युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी विधान भवन समोर रॉकेल आतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.