भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावे आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

भाजपने शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्री पद द्यावे, या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकतात. भाजपने याचा विचार करावा, असा कळकळीचा जाहीर सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

    शिवसेना ऐकणार नसेल तर भाजपाने उपमुख्यमंत्रिपद घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा, रामदास आठवलेंचा नवा फॉर्म्युला!

    मुंबई –  रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आजही सेना भाजप युतीचे सरकार व्हावे म्हणून आग्रही आहेत. त्यातच त्यानी भाजपला सल्ला देताना ‘शिवसेना ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावे आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे, असा सल्ला दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले की, शिवसेनेच्या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्या प्रमाणे शिवसेना-भाजपाने एकत्र यावे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा. आता भाजपाने मोठे मन करून काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर करण्यासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा विचार करावा, असेही आठवले म्हणाले.

    भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती

    भाजपाला वाटत होतं की तिन्ही पक्ष एकत्र येणार नाही. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असे भाजपला वाटले, पण त्यांचा अंदाज चुकला. शिवसेना आता ऐकणार नाही. भाजपने शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्री पद द्यावे, या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकतात. भाजपने याचा विचार करावा, असा कळकळीचा जाहीर सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावे, अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती अशी आठवणही आठवलें यानी सांगितली.