Ramdas Athavale demands arrest of Sambhaji Bhide

मुंबई :  संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता कारवाई का करत नाही? असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. तसेच संभाजी भिडेंना अटक करावी अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.

खरे नक्षलवादी आहेत, त्यांना पकडलंच पाहिजे. सध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई का झालेली नाही असा सवाल आठवले यांनी विचारला आहे.

करोनामुळे यंदा भीमा-कोरेगावला येऊ नका. घरातच प्रार्थना करावी असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, मी एक जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तिथे जाऊन अभिवादन करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.