
मोदी आहेत नंबर वन; त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा २०२४ चा क्षण!’ असं ट्वीट करत रामदास आठवले यांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवर टोला लगावला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्रमंचची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपविरोधात टिकेची झड उठली. परंतु राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर केंद्रीय राज्य मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलंय. ४ ओळींच्या माध्यमातून आठवले यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.
मोदी आहेत नंबर वन;
त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन !
मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन;
म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण!— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 22, 2021
मोदी आहेत नंबर वन; त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा २०२४ चा क्षण!’ असं ट्वीट करत रामदास आठवले यांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवर टोला हाणलाय. याआधी शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात मुंबईमध्ये बैठक पार पडल्यानंतर रामदास आठवले यांनी त्यावर भाष्य केलं होतं. पवार आणि किशोर यांची भेट झाली असली तरी मोदींना हरवणं सोपं नाही. २०२४ ला मोदींच्याच नेतृत्वात सत्ता येईल, असा दावा आठवले यांनी केला होता.