मुद्देसूद मांडणी करण्याची हातोटी असणारा नेता म्हणून रणपिसे यांची उणीव भासत राहील : मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

    मुंबई : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

    विधीमंडळातील त्यांचा वावर हा मार्गदर्शक असा होता. त्यांची राजकीय आणि सामाजिक भूमिका ठाम होती. संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास असणारे, मृदुभाषी आणि अनेक विषयांची मुद्देसूद मांडणी करण्याची हातोटी असणारा नेता म्हणून दिवंगत रणपिसे यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.