रूग्ण संख्या झपाटयाने वाढल्याने मुंबईत कोरोनाचा धोका; दिवसभरात ६०२ रूग्ण सापडल्याने चिंता वाढली

मुंबईत कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्या वाढू लागली आहे.आता तर कोरोनाचे रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असून बुधवारी पाचशेच्या दिशेने सरकारणारा आकडा गुरूवारी ६०२ वर गेला असल्याने ही मुंबईकरासाठी धोक्याची घंटा आहे(Rapid corona threat in Mumbai due to rapid increase in patient numbers; Anxiety increased as 602 patients were found during the day).

    मुंबई : मुंबईत कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्या वाढू लागली आहे.आता तर कोरोनाचे रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असून बुधवारी पाचशेच्या दिशेने सरकारणारा आकडा गुरूवारी ६०२ वर गेला असल्याने ही मुंबईकरासाठी धोक्याची घंटा आहे(Rapid corona threat in Mumbai due to rapid increase in patient numbers; Anxiety increased as 602 patients were found during the day).

    आज६०२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या मुंबईची एकूण रुग्णसंख्या ७,६८,७५० झाली आहे.आज २०७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ७,४६,९९१ झाली आहे.आज एका रूग्णाचा मृत्य झाला.त्यामुळे मृतांची संख्या १६,३६७ रूग्ण झाली आहे.मुंबईत सध्या २८१३ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

    मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे.कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के असून रुग्णदुपटीचा कालावधी १७४७ दिवस असा आहे.आजच्या चाचण्या ३९,४२३असून आतापर्यंतच्या एकूण चाचण्या ०१३३,३१,१४० एवढया झाल्या आहेत.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हळू हळू वाढणारी कोरोनाची रूग्णसंख्या दोन दिवसांपासून झपाटयाने वाढत आहे.आज तर तिने सहाशेचा टप्पा पार केला आहे.त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाचा पुन्हा विळखा पडत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.