खंडणी मागणाऱ्या रवी पुजारी गँगच्या सदस्यास अटक; बॉलीवुड मधील सेलिब्रिटी आणि उद्योगपती होते निशाण्यावर

मुंबईतील एकाबिल्डरला फोनवरून धमकी देत २ कोटींची खंडणी मागणाऱ्या रवी पुजारी गँगच्या एका गँगस्टरला कर्नाटकमधील बेंगळुरूमधून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. महेश पुजारीअसे त्याचेए असून, पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. या गैंगस्टरने आपण रवि पुजारी टोळीचा हस्तक आल्याचे सांगत या बिल्डरला अनेकवेळा पैशांसाठी धमकी दिली होती(Ravi Pujari gang member arrested for demanding ransom; Bollywood celebrities and businessmen were on target). 

  मुंबई : मुंबईतील एकाबिल्डरला फोनवरून धमकी देत २ कोटींची खंडणी मागणाऱ्या रवी पुजारी गँगच्या एका गँगस्टरला कर्नाटकमधील बेंगळुरूमधून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. महेश पुजारीअसे त्याचेए असून, पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. या गैंगस्टरने आपण रवि पुजारी टोळीचा हस्तक आल्याचे सांगत या बिल्डरला अनेकवेळा पैशांसाठी धमकी दिली होती(Ravi Pujari gang member arrested for demanding ransom; Bollywood celebrities and businessmen were on target).

  आरोपीने २ कोटी देण्यासाठी बिल्डरकडे तगादा लावला होता. याबाबत भीतीने या बिल्डरने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर कर्नाटक तसेच मुंबईत यापूर्वीचे कोणते गुन्हे दाखल आहेत काय याचा तपास आता करण्यात येत आहे.

  या गँगस्टरच्या धमक्यांकडे या बिल्डरने सुरुवातीला दुर्लक्ष केले होते. मात्र त्याने नंतरआपण रवी पुजारी गँगचा सदस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे बिल्डरने क्राईम ब्रांचमध्ये तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्याचे कॉल रेकॉर्ड तपासत त्याचा बेंगळुरू येथील ठावठिकाणा शोधला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक बेंगळुरू मध्ये गेले. तेथे त्याची तांत्रिक पद्धतीने तपास करून ओळख पटवण्यात आली आणि महेश पुजारीला बेड्या ठोकल्या.

  त्याच्याकडून पोलिसांनी मोबाइल, लैपटॉप, एक डायरी जप्त करण्यात आली आहे. अटकेनंतर महेशने आपण रवी पुजारी टोळीचा सदस्य असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान, गँग स्टर रवि पुजारी सद्या जेलमध्ये बंद आहे. तोही मूळचा कर्नाटक मधील उडीपी येथील आहे. तो परदेशात असतानाही मुंबईत वसूली रॅकेट चालवत होता.

  बॉलीवुड मधील सेलिब्रिटी आणि उद्योगपती त्याच्या निशाण्यावर होते. त्याच्या विरोधात मुंबईसह गुजरात आणि इतर ठिकाणी खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे रवी पुजारीवर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत पैसे उकळण्याबरोबरच संपती बाबतचे गुन्हे आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्याला फेब्रुवारी २०२० मध्ये पश्चिम आफ्रीका येथील सेनेगल मधून अटक करून आणण्यात आले होते. तेव्हापासून त्याचे हस्तक थेट त्याच्या गावातून म्हणजेच कर्नाटक मधून खंडण्या गोळा करण्याचे काम करत आल्याचे समोर आले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022