100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडून पाच हजाराची वसुली; निवृत्त न्यायामूर्तीच्या चांदिवाल आयोगाची कारवाई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पत्रामार्फत भ्रष्टाचाराचे पत्रामार्फत गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीच टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप त्यात करण्यात आला होता. याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत खंडपीठाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर दुसरीकडे, या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या मार्फत समांतर न्यायालयीन चौकशीही केली जात आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल समिती मुंबईचे माजी परमबीर सिंह यांना मंगळवारी ५ हजारांचा दंड ठोठावला. परमबीर सिंह यांनी आयोगासमोर निर्देश देऊनही अद्याप प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने दंड आकारण्यात आला असून दंडाची रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे आदेश आयोगाने जारी केले आहेत.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पत्रामार्फत भ्रष्टाचाराचे पत्रामार्फत गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीच टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप त्यात करण्यात आला होता. याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत खंडपीठाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर दुसरीकडे, या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या मार्फत समांतर न्यायालयीन चौकशीही केली जात आहे.

    चांदीवाल यांनी ३० मे रोजी पाच जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने ११ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, परमबीर सिंह यांनी आयोगाने निर्देश देऊनही अद्याप प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने याप्रकऱणी त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर अनिल देशमुख यांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागणार अर्ज यापूर्वीच सदर केलेला आहे.

    सचिन वाझे आयोगापुढे हजर

    सचिन वाझे यांनाही मंगळवारी चांदिवाल आयोगापुढे हजर करण्यात आले. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेंना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, वाझेंनी आयोगापुढे अर्ज करत जबाब देण्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्याची दखल घेत आयोगाने त्यांना 5 जुलैपर्यंत मुदतवाढ देत त्यादिवशी त्यांना पुन्हा आयोगासमोर हजर करण्याचे निर्देश जारी केले.