Recruitment process should not be carried out till maratha reservation is in hand Vinayak Mete nrvb
आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये : विनायक मेटे

मराठा समाजातील (maratha community) विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीला ( maratha reservation state meeting) उपस्थित होते.

मुंबई : आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असे मत शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी रविवारी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मांडले.

मराठा समाजातील विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीसाठी उपस्थित होते. या वेळी मेटे म्हणाले, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय करणार याबाबत ४ जानेवारीपर्यंत सरकारने चर्चा करावी आणि जो निर्णय घेतला त्याबाबत पुन्हा मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन माहिती द्यावी.

सर्वोच्च न्यायालयाने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून पुढील रणनीती ठरवावी. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असे ते म्हणाले. डिसेंबरपर्यंत सरकारने काहीच हालचाल केली नाही तर जानेवारीत बैठक घेऊन आगामी काळातील आंदोलन, रास्ता रोको, धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.