Reply to Sanjay Raut's 'That' tweet by Ramdas Athavale in his special estimate

'आ देखे जरा किसमे कितना दम', असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते. 'हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम', असं म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या कवी अंदाजात उत्तर दिले आहे.

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. रविवारी याबाबते वृ्त्त प्रसारित झाल्यानंतर संजय राऊत यांनी हिंदी गाण्याच्या ओळी ट्विट करत कुणात किती दम आहे, हे बघू असं म्हटलं होते. त्यांच्या ‘त्या’ ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा आपल्या खास अंदाजात रिप्लाय केला आहे.

‘आ देखे जरा किसमे कितना दम’, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते. ‘हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम’, असं म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या कवी अंदाजात उत्तर दिले आहे.

‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…’ अशा बॉलिवूडमधील एका लोकप्रिय गाण्याचा ओळी संजय राऊत यांनी ट्विट केल्या होत्या. या ट्विटच्या माध्यातून राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा होता.