आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींच्या ६१ जागांना फटका; खुल्या गटातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना होणार फायदा 

या निर्णयामुळे पालिकेच्या २२७ नगरसेवकांच्या जागांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी २२७ जागांमध्ये ५० जागा महिलासांठी राखीव होत्या. तसेच १५ जागा अनुसूचित जातींसाठी, २ जागा शेडूल्ड ट्राइब्ससाठी तर ६१ जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

    मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे मुंबई महापालिकेतील ओबीसींच्या ६१ जागांना फटका बसणार असल्याचे समजते. मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ ची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ओबीसींसाठी असलेल्या आरक्षित जागा खुल्या करून निवडणुका होणार आहेत. याचा फटका ओबीसी समाजाला बसणार असून खुल्या गटातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे.

    या निर्णयामुळे पालिकेच्या २२७ नगरसेवकांच्या जागांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी २२७ जागांमध्ये ५० जागा महिलासांठी राखीव होत्या. तसेच १५ जागा अनुसूचित जातींसाठी, २ जागा शेडूल्ड ट्राइब्ससाठी तर ६१ जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

    २०१७ ची निवडणूक २०११ च्या जणगणनेनुसार झाली होती. २०२२ ची निवडणूकही २०११ च्या जणगणने नुसार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींची जनगणना करून लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या करून निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

    मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी असलेल्या ६१ जागांवरील आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. याचा फटका ओबीसींमधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे. तर खुल्या वर्गातील जागा वाढणार असल्याने पुढील निवडणुकीत खुल्या वर्गातील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.