satej patil

गुरुवारी महाराष्ट्र एस टी कर्मचारी(St Employee) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील(Satej Patil) यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सदरची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात येतील व याबाबत निवृत्त कर्मचाऱ्यांसोबत लवकरच एक बैठक घेऊन थकीत देण्यासह इतरही प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन सुद्धा देण्यात आले.

    मुंबई: एसटी(ST) महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे(Retirement) रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे(Money For Retired ST Employees) महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ६०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २००कोटी रुपये देणे थकीत असून अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत.

    ही रक्कम देण्यासाठी एस टी महामंडळाकडे निधी नसल्याचे समाेर आले आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सदरची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात येतील व याबाबत निवृत्त कर्मचाऱ्यांसोबत लवकरच एक बैठक घेऊन थकीत देण्यासह इतरही प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन सुद्धा देण्यात आले.

    गेल्या चार वर्षात ८० पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती यावेळी राज्यमंत्र्यांना देण्यात आली. काेराेना आजाराच्या उपचाराकरीता कर्मचाऱ्यांना पैशांची चणचण भासत असल्याची खंत कर्मचाऱ्यांचे कुटुंब व्यक्त करत आहे. २०१८ पासून ७ हजार ६००कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. सर्व निवृत्त कामगारांना व अधिकाऱ्यांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह मिळण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, कार्याध्यक्ष डी. ए. लीपणे- पाटील हे हजर होते.