Revenue Minister Balasaheb Thorat, NCP MLA Shekhar Nikam, former Health Minister Deepak Sawant also corona positive.

मुंबईतील पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांना कोरोना संसर्गाने गाठल्याचे दिसून येत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी, भाजप आमदार सागर मेघे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नंतर ही यादी वाढतच चालली आहे. आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे(Revenue Minister Balasaheb Thorat, NCP MLA Shekhar Nikam, former Health Minister Deepak Sawant also corona positive).

    मुंबई : मुंबईतील पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांना कोरोना संसर्गाने गाठल्याचे दिसून येत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी, भाजप आमदार सागर मेघे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नंतर ही यादी वाढतच चालली आहे. आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे(Revenue Minister Balasaheb Thorat, NCP MLA Shekhar Nikam, former Health Minister Deepak Sawant also corona positive).

    चिपळूणचे आमदार शेखर निकम कोरोनाग्रस्त

    ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम हे देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्याचवेळी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ दिपक सांवत हे दुस-यांदा कोरोनाबाधित  झाले आहेत.

    व्हिआयपीचे विवाह सोहळे मात्र मोठ्या गर्दीत

    कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन वेरीयंटने झपाट्याने हातपाय पसरण्यास सुरूवात केली असून समूह संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच गेल्या सप्ताहात राज्यात व्हिआयपीचे विवाह सोहळे मात्र मोठ्या गर्दीत पार पडताना दिसत आहेत. त्याचा फटका माजी मंत्री आणि वधु पिता हर्षवर्धन पाटील यांना बसला आहे.  त्यांची कन्या अंकिता पाटील  आणि मुख्यमंत्र्याचा पुतण्या निहार ठाकरे यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेला एक एक नेता आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे त्यांचे पति सदानंद, यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.