
मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून मुंबईतील उबेर व इतर टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी मुंबई पोलीस आयुक्तांलयाकडे येत आहेत. याच तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील ओला, उबर आणि इतर टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळं टॅक्सी किंवा रिक्ष्यावाल्यांच्या मुजोरपणावर आता चाप बसणार आहे.
मुंबई : जर तुम्ही मुंबईत टॅक्सी किंवा रिक्ष्याने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा, कारण ही बातमी तुमच्या कामाची आहे. मुंबईत टॅक्सी किंवा रिक्ष्याने प्रवास करत असताना, त्यांच्या मुजोरपणाचा अनुभव अनेकांनी घेतला असेल किंवा टॅक्सी किंवा रिक्ष्यावाल्यांनी भाडे नाकारल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. पण यावर आता टॅक्सी किंवा रिक्ष्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून मुंबईतील उबेर व इतर टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी मुंबई पोलीस आयुक्तांलयाकडे येत आहेत. याच तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील ओला, उबर आणि इतर टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळं टॅक्सी किंवा रिक्ष्यावाल्यांच्या मुजोरपणावर आता चाप बसणार आहे.
दरम्यान, या बैठकीत मुंबईतील सध्याच्या वाहतूकीच्या समस्यांबाबत आणि टॅक्सी रिक्षा चालकांच्या भूमिका आणि कर्तव्याबाबत माहिती देत काही नव्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या सूचनांचे पालन न केल्यास टॅक्सी किंवा रिक्ष्यावाल्यांवर कारवाई होणार आहे.
काय आहेत नव्या सूचना?
- ज्या ठिकाणी टॅक्सी रिक्षांचे थांबे काढून टाकले असतील त्याची यादी संबंधीत पोलीस ठाण्यात देण्यात यावी. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
- मुंबईत अनेक ठिकाणी रिक्षाचे पुरेसे स्टँड नाहीत त्यामुळे पुरेसे स्टँड निर्माण करण्यासाठी संभाव्य स्टँडची यादी वाहतूक पोलिसांना सादर करावी.
- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर वाहतूक निमयांप्रमाणे कारवाई केली जाईल.
- मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
- टॅक्सी रिक्षा चालक रेल्वे स्थानकांसमोर चूकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात त्यामुळे जनतेला त्रास होतो त्यामुळे शिस्तीचे पालन करा.