पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या…

देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज पुन्हा एकदा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. आज पेट्रोल प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 28 पैशांनी महागले आहे.

  मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज पुन्हा एकदा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. आज पेट्रोल प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 28 पैशांनी महागले आहे.

  दरम्यान या दरवाढीसह राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 98.81 रुपये प्रतिलिटर तर डिझेलची किंमत 89.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा दर 104.90 रुपये असून डिझेलचा दर हा 96.73 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. तरी देशांतर्गत बाजारात तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. 4 मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 32 वेळा वाढ झाली आहे.

  देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

  शहर             पेट्रोल        डिझेल
  मुंबई            104.90       96.73
  दिल्ली           98.81        89.18
  चेन्नई            99.80       93.72
  कोलकाता      98.64        92.03

  देशातील सर्व शहरांचा विचार करता, भोपाळमध्ये पेट्रोलचे दर हे सर्वाधिक आहेत. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर हा 107.07 रुपये असून डिझेलचा दर हा 97.93 रुपये इतका आहे. तर डिझेलचा सर्वाधिक दर देशात जयपूरमध्ये आहे. जयपूरमध्ये डिझेल 98.29 रुपये प्रतिलिटर एवढं आहे.

  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेट्रोलियम उत्पादक देशांमध्ये कच्च्या तेलाची कमी किंमत असूनही एका षडयंत्रांतर्गत पेट्रोल आणि डिझेल जास्त किंमतीला विकल्या गेल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि तक्रारदार तमन्ना हाशमी यांनी केला आहे.

  पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

  • इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

  देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत.