भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केला आहे. त्यांनी ट्विट करत फडणवीस यांच्याविरोधात अनेक सवाल उपस्थित केले आहेत. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होतो…? अशा प्रकारचा थेट सवाल उपस्थित करत रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत फडणवीसांवर टीका केली आहे.

    जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्रतिसवाल केला आहे. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केला आहे.

    रोहिणी खडसे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल