प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

घरात किंवा गच्चीवर. तिथं किती लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे, याबाबत निश्चित आकडा ठरवण्यात आलेला नाही. मात्र जागेची उपलब्धता किती आहे, जागा किती मोठी आहे, यावर ते अवलंबून आहे. छोट्या गच्चीत गर्दी होत असेल, तर ते चालणार नाही. गर्दी न करता जाऊ शकता. छोट्या छोट्या गटाने लोक जात असतील आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत असतील, तर पोलीस अडवणूक करणार नाहीत. पण गर्दी होऊ लागली, तर मात्र पोलीस प्रवेश बंद करून टाकू शकतात.

जगभरात नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यद तयारी सुरू आहे. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि इतर नियमांचं पालन करून महाराष्ट्रातील शहरांमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करावं लागणार आहे. मुंबईतही नव्या वर्षाचं स्वागत करताना काही नियम आणि अटींचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. आजच्या रात्री (गुरुवारी) मुंबईत कशाला परवानगी असेल आणि कशाला मनाई असेल यासंबंधी मुंबईचे सह-पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिलीय.

प्रश्न – रात्री ११ नंतर पार्टी केली तर चालेल का?

चालेल. पण नियम पाळून आणि गर्दी न होऊ देता. पण सार्वजनिक ठिकाणी नाही. घरात किंवा गच्चीवर. तिथं किती लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे, याबाबत निश्चित आकडा ठरवण्यात आलेला नाही. मात्र जागेची उपलब्धता किती आहे, जागा किती मोठी आहे, यावर ते अवलंबून आहे. छोट्या गच्चीत गर्दी होत असेल, तर ते चालणार नाही.

प्रश्न – किती गर्दी चालेल?

दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचं अंतर ठेवता आलं पाहिजे. त्यापेक्षा कमी अंतर असेल, तर चालणार नाही. सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे. पोलिसांना जर गर्दी होत असल्याचा संशय आला किंवा कुणी तशी तक्रार केली, तर पोलीस कारवाई करू शकतात.

रात्री ११ वाजल्यानंतर प्रवास करू शकतो का?

चालेल. पण एका अटीवर. दुचाकीवर दोन आणि कारमध्ये चार लोकं चालतील. शिवाय जागोजागी नाकाबंदी असणार आहे. ड्रायव्हिंग करणाऱ्याला प्रत्येक ठिकाणी अल्कोहोल टेस्ट द्यावी लागणार आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात, याची चौकशीदेखील केली जाणार आहे. वेगानं वाहन चालवणे आणि नियम मोडणे, यावर तर कारवाई होणारच.

रेस्टॉरंट, बार ११ नंतर सुरू राहतील का? अगोदर ऑर्डर दिली असेल तर ११ च्या पुढे बसू शकतो का?

नाय, नो, नेव्हर. ११ म्हणजे ११. कोरोना निर्बंधामुळे ही ठिकाणं ११ नंतर बंद असणार आहेत. अत्यावश्यक सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील. मात्र स्विगी किंवा झोमॅटोची सेवा सुरू असेल. तुम्ही रेस्टॉरंटमधून जेवण मागवू शकता.

सार्वजनिक वाहतुकीचे काय?

सार्वजनिक वाहतूक सुरूच असेल. तुम्ही टॅक्सी, ओला किंवा उबरने जाणार असाल, तर ड्रायव्हरसह चार जण प्रवास करू शकतात. मात्र दरवर्षी जशी मध्यरात्रीनंतर लोकांना घरी सोडण्यासाठी विशेष बस किंवा ट्रेन असते, तशी ती नसणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया किंवा नरिमन पॉईंटला जाऊ शकतो का?

गर्दी न करता जाऊ शकता. छोट्या छोट्या गटाने लोक जात असतील आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत असतील, तर पोलीस अडवणूक करणार नाहीत. पण गर्दी होऊ लागली, तर मात्र पोलीस प्रवेश बंद करून टाकू शकतात.