सत्ताधारी पक्षांनी आराजकता माजवत किरिट सोमैय्यांवर बेकायदा कारवाई केली; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी

सध्या राज्याचे माजी गृहमंत्री चौकशीला हजर न राहता सहकुटूंब फरार आहेत, त्यांच्या या कृत्याने राज्याची जगभरात बदनामी होत आहे, तर मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या अधिका-या बाबत तो विदेशात पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात पोलिसात तक्रार करायला जाणा-या करूणा शर्मा या महिलेवर खोटे आरोप करून त्यांनाच अटक केले जात आहे. तर लखोबा लोखंडे नावाने समूह माध्यमांवर मत व्यक्त करणा-या मराठी तरूणांला न्यायालयासमोर पोलीसांसमोर एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली आहे.

  मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात ज्या घटना घडल्या आहेत त्यातून सत्ताधारी पक्षांकडूनच आराजकता माजवली जात आहे, असा आरोप भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अवगत न करता किरिट सोमैय्या यांच्यावर बेकायदा कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे त्याबाबत निवृत्त न्यायाधिशा मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे करत असल्याचे सांगितले. ते भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

  माजी गृहमंत्री सहकुटूंब फरार

  सध्या राज्याचे माजी गृहमंत्री चौकशीला हजर न राहता सहकुटूंब फरार आहेत, त्यांच्या या कृत्याने राज्याची जगभरात बदनामी होत आहे, तर मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या अधिका-या बाबत तो विदेशात पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात पोलिसात तक्रार करायला जाणा-या करूणा शर्मा या महिलेवर खोटे आरोप करून त्यांनाच अटक केले जात आहे. तर लखोबा लोखंडे नावाने समूह माध्यमांवर मत व्यक्त करणा-या मराठी तरूणांला न्यायालयासमोर पोलीसांसमोर एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली आहे.

  सत्ताधा-यांच्या अराजकतेमुळे कायद्याचे राज्य नाही

  केंद्रीय मंत्री पदावरील नेत्याला साध्या अदखलपात्र गुन्ह्याच्या कलमाखाली अटक करण्याची बेकायदा कारवाई केली जात आहे, तर माजी खासदाराला तो भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविण्यास जात असल्याने स्थानबध्द केले जात आहे. राज्यात सरकारच्या चुका दाखविणा-या संपादकाला घरातून अटके केली जात आहे, तर टिका करणा-यांना धमकावले जात आहे. त्यामुळे राज्यात अराजकता माजविण्यात सत्ताधारी पक्षांचे लोक गुंतले असून कायद्याचे राज्य राहिले नाही. त्यामुळे राज्याची देशातील प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन झाली आहे असे शेलार म्हणाले.

  मुख्यमंत्री चौकशी करणार आहेत की नाही?

  सोमैय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे त्यामुळे त्यांना जिवाला धोका आहे म्हणून स्थानबध्द करण्याऐवजी त्यांना धोका निर्माण करत कायदा हातात घेणा-यां विरोधात सरकारने काही कारवाई का केली नाही? हा सवाल आहे. सोमैय्या हे तक्रार करण्यास जात होते म्हणजे ते सरकारी कामासाठी जात होते त्यात त्यांना अटकाव करणे हा देखील गुन्हा आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्याना अवगत करण्यात आले नाही असे सांगण्यात येत आहे असे शेलार म्हणाले. ते म्हणाले की असे असेल तर मुख्यमंत्री आता तरी या बाबत गंभीर दखल घेवून योग्य ती चौकशी करणार आहेत की नाही? त्यांनी महाराष्ट्राची प्रथा, कायदा आणि प्रतिष्ठा यांची बूज राखण्यासाठी या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात जावून दाद मागावी लागेल असे शेलार म्हणाले.