मुंबई महापालिकेत सचिन वाझेच्या रुपात यशवंत जाधव, इकबाल सिंह चहल बसलेत, अमित साटम यांचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इक्बालसिंह चहल, वेलरसु यांच्या रुपात सचिन वाझे बसलाय, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. आयटीच्या तपासणी अहवालात 15 कोटी रुपये आणि 15 कोटींचा मनी लॉन्डरिंग करण्याचा पुरावा तसेच त्यामध्ये जवाब नोंदवण्यात आला आहे. प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या मुलांच्या नावे करून असुरक्षित लोक दाखवून 15 कोटींचा गोलमाल करण्यात आलेला आहे. असा आरोप भाजप नेते, आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे .

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेची आगामी काळात निवडणूक होणार आहे, परंतू आतापासूनच पालिकेतील आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहे. मुंबई महापालिकेत सचिन वाझे्च्या रुपात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इक्बालसिंह चहल, वेलरसु बसलेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. आयटीच्या तपासणी अहवालात 15 कोटी रुपये आणि 15 कोटींचा मनी लॉन्डरिंग करण्याचा पुरावा तसेच त्यामध्ये जवाब नोंदवण्यात आला आहे. प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या मुलांच्या नावे करून असुरक्षित लोक दाखवून 15 कोटींचा गोलमाल करण्यात आलेला आहे. असा आरोप भाजप नेते, आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे .

    दरम्यान, स्थायी समितीच्या टक्केवारीतून मिळवलेला पैसा हा कशा पद्धतीने फिरवण्यात आलाय. अशा सहकाऱ्यांवरती अभिमान तर असेलच तसेच त्यांच्यासाठी हा अभिमान असणं चांगली गोष्ट आहे. ज्या स्थायी समितीच्या अध्यक्षांवरती भाजपने अविश्वासाचा ठराव मंजूर केला आहे, असं म्हणत भाजप आमदार अमित साटम यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांवर गंभीर आरोप केलाय. तसेच मागील 25 वर्षामध्ये स्थायी समिती वसुली समिती झालीये. परंतु 2015 मध्ये 6000 रुपयांना महापालिका टॅब विकत घ्यायची. त्याच टॅबची किंमत आता 20000 रुपये झाली असून, अशा पद्धतीचं टेंडर काढण्यात आलं. मिठी नदीचं सुद्धा 2 हजार कोटींचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये मिशीगन इंजिनीअर्स आणि म्हाळसा या दोन कंपन्यांना हे टेंडर मिळणार असल्याचं आज जाहीर करतो. महापालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये सचिन वाझे बसलेला आहे. स्थायी समिती अध्यक्ष आणि इक्बाल सिंह चहल यांच्या रूपामध्ये सचिन वाझे आहेत. असा घणाघाती आरोप साटम यांनी केला आहे.

    गेल्या ५ वर्षांपासून मंबई शहराच्या स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार, वसुली आणि वाझेगिरी सुरू आहे. दर वर्षाला कमीत कमी ६ हजार कोटी रूपयांचे टेंडर्स हे पास होतात आणि २५ वर्षांचा हिशोब जर आपण लावला तर फक्त स्थायी समितीच्या मार्फेत किमान दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार हा सत्ताधाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांमध्ये मुंबई शहरांमध्ये करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे या सर्व कारभाराच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला आहे, असं अमित साटम म्हणाले. साटम यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर यशवंत जाधव, आयुक्त काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.