Devendra-Fadvanis

सचिन वाझेले ऑपरेट करणारे सरकारमध्ये बसलेत, त्यांची चौकशी कोण करणार? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. मुंबईतील सर्व हायप्रोफाईल केसेस असतील त्या केसेस ज्या कार्यक्षेत्रात घडत होत्या त्या केसेस सीआययूकडं म्हणजेच गुप्तवार्ता विभागाकडे येत होत्या. त्या केसेस सीआयूला दिल्या जात होत्या असा आरोप देवेंद्र फडवीस यांनी केला आहे.

  मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली. यानंतर या गाडीचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळालेय. वाझेंच्या निलंबनानंतर आता पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व घटाना क्रमानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी वाझे तसेच ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत.

  सचिन वाझेले ऑपरेट करणारे सरकारमध्ये बसलेत, त्यांची चौकशी कोण करणार? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. मुंबईतील सर्व हायप्रोफाईल केसेस असतील त्या केसेस ज्या कार्यक्षेत्रात घडत होत्या त्या केसेस सीआययूकडं म्हणजेच गुप्तवार्ता विभागाकडे येत होत्या. त्या केसेस सीआयूला दिल्या जात होत्या असा आरोप फडवीस यांनी केला.

  पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले गंभीर आरोप

  • सचिन वाझे यांना अधिकारी म्हणून नाही तर एक वसुली अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • पोलीस हिरेन यांची तक्रार करुन घेत नव्हते. मात्र, यावेळी वाझे यांनी पोलिसांना फोन करुन तक्रार दाखल करण्याचे सांगितले.
  • मनसुख हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली. दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने हिरेन यांची चौकशी केली नाही.
  • हिरेन यांची हत्याच झाली. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हिरेन यांच्या फुप्फुसात पाणी नाही. त्यांनी जर खाडीत आत्महत्या केली असती तर त्यांच्या फुफ्फुसात पाणी गेलं असतं. पण तसं नाहीये. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली.
  • मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण या दोन्ही घटना एकमेकांशी कनेटक्टेड आहेत. हो दोन्ही प्रकरणं एनआयने स्वत:तकडे सोपवली पाहिजेत.
  • मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयकडे गेला पाहिजे.
  • या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं,ज्या उद्देशानं वाझे यांना त्या पदावर बसवलं त्याचा तपास केला पाहिजे.