cash

गलेलठ्ठ पगार घ्याल तर तुम्हीही स्वार्थी आणि भावनाहीन होऊ शकता, असा इशारा एका ताज्या संशोधनाने दिला आहे.  जे लोक अधिक पैसे कमावतात किंवा ज्यांचा पगार खूप अधिक असतो, ते स्वार्थी बनतात. ज्यांची कमाई सर्वसामान्य असते किंवा ज्यांचा पगार सामान्य असतो, त्यांची वागणूक अधिक पगार असलेल्यांच्या तुलनेत चांगला असतो, असा निष्कर्ष या पाहणीने काढला आहे.  

दिल्ली : अधिकाधिक सुखसुविधा व आराम मिळविण्यासाठी अधिक पगार मिळवावा, असे सगळ्यांनाच वाटते. आणि तसाच जोडीदार मिळावा अशी अपेक्षाही केली जाते. मात्र, तुम्ही तुमच्या जोडीदार्चाय पगारावरुन ओळखू शकता की तुमचा जोडीदार सेल्फीश आणि भावनाहीन तर नाही ना.

गलेलठ्ठ पगार घ्याल तर तुम्हीही स्वार्थी आणि भावनाहीन होऊ शकता, असा इशारा एका ताज्या संशोधनाने दिला आहे.  जे लोक अधिक पैसे कमावतात किंवा ज्यांचा पगार खूप अधिक असतो, ते स्वार्थी बनतात. ज्यांची कमाई सर्वसामान्य असते किंवा ज्यांचा पगार सामान्य असतो, त्यांची वागणूक अधिक पगार असलेल्यांच्या तुलनेत चांगला असतो, असा निष्कर्ष या पाहणीने काढला आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे पॉल पिफ यांनी ही पाहणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे लोक अधिक पैसे कमावतात ते आनंदी नसतात, पैशांनी आनंद विकत घेता येत नाही. असे अलीकडच्या संशोधनाकडे पाहून म्हणता येते.

या पाहणीत १५१९ लोकांचा अभ्यास करण्यात आला. पाहणीच्या काळात त्यांच्या कमाईबाबत काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला. कमी पगार असलेले लोक नातेही अधिक समर्थतेने निभावतात आणि लोकांसोबत त्यांचे अधिक पटते. पैसा तुम्हाला वेगळ्या प्रकारचा आनंद देतो. मात्र, सामान्य पैसा तुमच्या आत सकारात्मकता, इतरांसाठी प्रेम आणि काळजी घेऊन येतो, असाही निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला आहे.