salman khan

तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमान सायकल चालवत असताना त्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. मात्र त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत त्यांच्या हातातून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आणि त्यांना धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता.

    बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) अडचणींमध्ये काहीशी वाढ झाली आहे. सलमान खानला (Andheri Court) समन्स बजावलं आहे. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप करण्यात आला आहे.

    तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयानं दिले आहेत. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमान सायकल चालवत असताना त्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. मात्र त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत त्यांच्या हातातून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आणि त्यांना धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.