Kidney transplantation successful despite blood group separation; The first surgery at Nair Hospital

वरळीतील आगीच्या दुर्घटनेत(Worli Fire) भाजलेल्या दोन रुग्णांना मंगळवारी सकाळी नायर रुग्णालयात (Nair Hospital)दाखल करण्यात आले. गंभीररित्या भाजलेला एक लहान मुलगा आणि एक पुरुष हे दोघेही किमान तासभर उपचाराविना रुग्णालयात तडफडत होते. या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची बैठक बोलवावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते, आमदार रईस शेख(Rais Sheikh Demand To Mayor) यांनी महापौरांकडे केली आहे.

    मुंबई : नायर रुग्णालयातील(Nair Hospital Case) संपूर्ण दुर्घटनेबाबत महानगरपालिका आयुक्त प्रशासकीय अधिकारी यांंना जाब विचारण्याची गरज आहे. या रुग्णांची काय स्थिती आहे. या घटनेबाबतसंबंधिताची कोणत्या प्रकारची चौकशी करण्यात येईल. संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याची गरज आहे की नाही, अशा अनेक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची तातडीची बैठक आयोजित करणे बोलविण्याची मागणी समाजवादी पार्टीने(Samajwadi party Demands Meeting On Incident Happened In Nair Hospital ) केली आहे.

    दुर्घटनेतील रुग्णांना महानगरपालिकेमार्फत नुकसान भरपाई देण्याचीही मागणीही सपाने केली आहे. याबाबत लक्ष घालून, या विषयी गटनेत्यांची सभा तातडीने आयोजित करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते, आमदार रईस शेख यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

    वरळीतील आगीच्या दुर्घटनेत भाजलेल्या दोन रुग्णांना मंगळवारी सकाळी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीररित्या भाजलेला एक लहान मुलगा आणि एक पुरुष हे दोघेही किमान तासभर उपचाराविना रुग्णालयात तडफडत होते.आक्रोश करत होते. त्यांच्या या परिस्थितीकडे कानाडोळा करून अतिदक्षता विभागात उपस्थित असलेले डॉक्टर आणि परिचारिका खुर्चीवर बसून राहिले होते. हा प्रकार खुप वेळ असाच सुरु राहिल्यानंतर एकाने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

    महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांबरोबर घडलेली ही घटना अतिशय निंदनीय आहे. यात डॉक्टर आणि परिचारिका यांचा अमानुषपणा दिसून आला असून अशी घटना कधीही आणि कुठेही घडू नये. या घटनेमुळे जनसामान्यांचा रोष मुंबई महानगरपालिकेवर ओढवला असल्याने यापुढील काळात महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवर लोकांचा विश्वास राहणार नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. असे नमूद करून लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईकरांची आपल्यावर जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची बैठक बोलवावी अशी मागणी महापौरांकडे शेख यांनी केली आहे.