मराठा आरक्षणा पुणे ते मुंबई… खासदार छत्रपती संभाजी राजेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाबाबत आपल्या मागण्यांवर विचार न केल्यास पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला दिला आहे(Sambhaji Raje Bhosale On Maratha Aarakshan).

    मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आपल्या मागण्यांवर विचार न केल्यास पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला दिला आहे(Sambhaji Raje Bhosale On Maratha Aarakshan).

    आरक्षणाचा विषय हा लगेच होणारा नाही. त्याला सहा महिने किंवा वर्ष लागेल. राज्य सरकारची जबाबदारी आहे की मागासवर्गीय आयोग स्थापन करून किंबहुना आयोग स्थापन करता येत नसेल तर अगोदर कमिटी स्थापन करावी. त्याचे सर्वेक्षण करावे. तुम्ही स्वतः सामाजिक मागास राहिलेले नाहीत.

    सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिले नियोजन आहे. पुढे काहीच होत नसेल तर केंद्रात जाऊ शकतो. पाच मूलभूत सुविधा समाजाला देऊ शकता. हीच मागणी मी केलेली आहे. यावर काही निर्णय झालेला नाही. यामुळे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याच मी ठरवलेले आहे. परत, मी थोडा वेळ देत आहे. जर यात देखील काही निर्णय घेतला नाही तर दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईत लाँग मार्च काढणार अस खासदार संभाजी राजे यांनी म्हटले आहे.