court

विशेष एनडीपीएस कोर्टाने १९४ कोटी गांजा बाळगल्याच्या प्रकरणातील समीर खान(Bail To Sameer Khan) यांना जामीन मंजूर केला आहे. समीर खान हे महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(nawab malik) यांचे जावई आहेत.

    मुंबई : मुंबईतील(Mumbai) विशेष एनडीपीएस कोर्टाने १९४ कोटी गांजा बाळगल्याच्या प्रकरणातील समीर खान(Bail To Sameer Khan) यांना जामीन मंजूर केला आहे. समीर खान हे महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab malik) यांचे जावई आहेत. फर्निचरवाला आणि करण संजानी यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

    ड्रग्ज प्रकरणातील(Bail In Drugs Case) एक आरोपी आणि त्याच्याशी २०,००० रुपयांचा ऑनलाईन व्यवहार उघडकीस आल्यानंतर एजन्सीने काही दिवसपुर्वी खान यांना समन्स बजावला होता. मुंबईत २०० किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती.

    एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका कुरिअरकडून गांजा ताब्यात घेतला होता. यावर पुढील कार्यवाही करत खार येथील करण सजनानी यांच्या घरातून गांजाची एक खेप जप्त करण्यात आली. करण सजनानी, राहिल फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार अटक केली गेली आणि त्यांना न्यायालयात हजर केले. तपासादरम्यान वांद्रे येथील रहिवासी समीर खानचे नाव पुढे आले, त्यानंतर त्याला आज चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आले होते. परंतु आज समीर खान. सेलेब मॅनेजर राहील फर्निचरवाला आणिकरण संजानी यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.