sanjay gandhi national park

कोरोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान(sanjay gandhi national park) काही दिवसांपूर्वी ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुरू झाल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद आणि नियमावलीचे पालन होत असल्याने मंगळवारपासून उद्यान(national park started for everyone सुरू झाले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी दिली.

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान(sanjay gandhi national park) काही दिवसांपूर्वी ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुरू झाल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद आणि नियमावलीचे पालन होत असल्याने मंगळवारपासून उद्यान(national park started for everyone सुरू झाले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी दिली.

दरम्यान उद्यानामध्ये प्रभातफेरी पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेतच सुरू राहील. त्यानंतर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात सोमवारी उद्यान बंद राहील. सूचनांचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुध्द दंडात्मक कारवाई केली जाईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ८ हजारांहून अधिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. तर अनेक पर्यटक नॅशनल पार्क पाहण्यासाठी येतात. पार्क बंद असलेल्या काळात तब्बल साडे सात कोटींचे नुकसान झाले.

या गोष्टी लक्षात ठेवा
– सद्यस्थितीतील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पाहता उद्यानातील इतर सोई सुविधा उदा. वनराणी, व्याघ्र व सिंह विहार व नौका विहार हे  पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत.
– खाजगी वाहनांना उद्यानात प्रवेशास पूर्णतः बंदी असेल त‌थापि पर्यटकांच्या वाहनांकरिता (मुख्य प्रवेशद्वार येथे) सशुल्क वाहन तळाची सोय करण्यात आली आहे.
– पर्यटकांना उद्यानात फिरण्यासाठी बेस्टच्या बसेसची सुविध उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
– ग्रुप ॲक्टीव्हिटीसाठी एकत्र येवू नये तसेच उद्यानामध्ये कुठेही बसू नये.
-सर्व पर्यटकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेवून उद्यानांत प्रवेश करावा.
-उद्यानात सुरक्षित अंतर वैयक्तीक संरक्षणाची साधने (मास्क व सॅनिटायझर्स) असावीत.
– पर्यटकांनी निर्धारीत केलेल्या मार्गाचाच अवलंब करावा.