सेवा ज्येष्ठतेच्या निकषाला राज्य सरकारकडून बगल, संजय पांडे हायकोर्टात मागणार दाद

संजय पांडे(sanjay pande to appeal in high court) १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार त्यांची वर्णी पोलीस महासंचालक पदावर लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती.

    मुंबई:राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नाराज असलेले आयपीएस अधिकारी संजय पांडे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

    संजय पांडे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार त्यांची वर्णी पोलीस महासंचालक पदावर लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती. रजनीश शेठ हे संजय पांडेंचे ज्युनियर आहेत. तरीही रजनीश यांना पोलीस महासंचालकपदी नेमण्यात आले. याविरोधात ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.