चंद्रकांत पाटील यांच्या PMC बॅंक घोटाळ्याच्या आरोपावर संजय राऊत ठोकणार सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

लोक ५० कोटी १०० कोटींचा दावा दाखल करतात, पण मी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार आहे. किरीट सोमय्या विरुध्द महाविकास आघाडी वाद आता सामना व्हाया संजय राऊत विरुध्द चंद्रकांत पाटील या वळणावर येऊन पोहोचला आहे.

    महाविकास आघाडी विरुध्द किरीट सोमय्या हा वाद संजय राऊत विरुध्द चंद्रकांत पाटील या वळणावर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांचे सामनातील अग्रलेखांबाबत आभार मानणारे एक उपरोधीत पत्र लिहिले. यात त्यांनी राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाल्याचा आरोप केला आहे.

    पत्नीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावर आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याच संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    माध्यमांच्या प्रतिनिधिंशी बोलताना राऊत म्हणाले की, “भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा त्यांना पुर्ण अधिकार आहे. आम्ही त्याचं उत्तर तसंच तसं छापलं आहे, असं सांगतानाच त्यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे.”

    काय म्हटलंय चंद्रकांत पाटील यांनी पत्रात

    या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी ‘तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार.’ असं म्हटलं आहे.