Sanjay Raut discusses with Chief Minister Uddhav Thackeray; 'Action' on Sarnaiks soon!

मनी लाँड्रिंग तसेच अवैध मालमत्ता प्रकरणात अडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत भेट घेतल्यानंतर दिले. रआऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत मातोश्री निवासस्थानी चर्चा केली. ही बैठक दोन तास झाली.

    मुंबई : मनी लाँड्रिंग तसेच अवैध मालमत्ता प्रकरणात अडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत भेट घेतल्यानंतर दिले. रआऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत मातोश्री निवासस्थानी चर्चा केली. ही बैठक दोन तास झाली.

    काही दिवसांपूर्वीच सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा एकदा भाजपासोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अजेंड्यावर काम करीत असल्याचा आरोप करीत यामुळे शिवसेना कमकुवत होत असल्याचा देखील दावा केला होता. सरनाईकांच्या या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

    बैठकीत प्रताप सरनाईक यांच्या मुद्यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी जर सरनाईक यांच्याबाबत निर्णय घेतला असेल तर लवकरच कारवाईचेही वृत्त येईलच. सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रातील भावनेविषयी ठाकरेंना सांगितले आहे. सरनाईक यांनी आजीवन शिवसेनेत राहण्याचेही म्हटले होते. तथापि, याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांनाच घ्यायचा आहे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना