संजय राऊतांवर दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री दीप्ती रावत- भारद्वाज यांनी मंडवली पोलिस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली होती, या मुलाखतीचा व्हिडिओही पोलिसांना सादर केला होता. तपासानंतर पोलिसांनी भादंविच्या ५०९ आणि ५०० (अश्लील शब्दांचा वापर आणि बदनामी) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राऊत यांच्यावर विनयभंगाचे कलम लावावे, अशी विनंती भारद्वाज यांनी पोलिसांकडे केली आहे.

    शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची घेऊन जातानाचा संजय राऊत यांचा फोटो व्हायरल करण्यात आला. काहींनी राऊत यांच्या बाजूने कमेंट केल्या. तर काहींनी शिवसेनेचा नेता राष्ट्रवादीची कामं करतो अशी टीका केली.  भाजपने या फोटोवरुन टीका केल्यानंतर संजय राऊतांनी ‘ही चु**** बंद करा’ असं म्हणत संताप व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपने आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांमध्ये धाव घेतली. तक्रारीची दखल घेत आता संजय राऊतांविरोधात दिल्लीच्या मंडावली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माध्यमांशी बोलताना ‘पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा’ अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

    भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री दीप्ती रावत- भारद्वाज यांनी मंडवली पोलिस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली होती, या मुलाखतीचा व्हिडिओही पोलिसांना सादर केला होता. तपासानंतर पोलिसांनी भादंविच्या ५०९ आणि ५०० (अश्लील शब्दांचा वापर आणि बदनामी) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राऊत यांच्यावर विनयभंगाचे कलम लावावे, अशी विनंती भारद्वाज यांनी पोलिसांकडे केली आहे.

    काय म्हणाले होते शिवसेना नेते खासदार संजय राऊत?

    “शरद पवारच काय, तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. आम्ही मांडी घालून बसतो. पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही. पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता, तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती. राजकारणात मतभेद असतील, तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत. ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये.”