आम्हीही पाहून घेऊ.., अनिल देशमुखांवरील ईडीच्या चौकशीबाबत बोलताना संजय राऊतांनी दिला रोखठोक इशारा

मुुंबईतील प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ, असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवाससाठी ईडीने काल छापे टाकले. यात जवळपास ९ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशीरा अनिल देशमुख यांच्या स्वीयसहाय्यक आणि खासगी सचिवांना अटक केली आहे. तर आज सकाळी ११ वाजता अनिल देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान, अनिल देशमुखांवरील ईडीच्या चौकशीबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोनच शब्दांमध्ये भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    मुुंबईतील प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ, असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.