Sanjay Raut gives chair to Sharad Pawar; Jitendra Awhad's reaction on trending issues in political circles

शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिग्गज राजकारणी मास्टरमाइंड असलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. सध्या राजकीय वर्तुळातील ट्रेंडिग विषय बनला आहे. यावरून जोरदार टिपटिप्पणी सुरु केली. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र संजय राऊत यांचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले आहेत( Sanjay Raut gives chair to Sharad Pawar; Jitendra Awhad's reaction on trending issues in political circles ). 

    मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिग्गज राजकारणी मास्टरमाइंड असलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. सध्या राजकीय वर्तुळातील ट्रेंडिग विषय बनला आहे. यावरून जोरदार टिपटिप्पणी सुरु केली. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र संजय राऊत यांचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले आहेत( Sanjay Raut gives chair to Sharad Pawar; Jitendra Awhad’s reaction on trending issues in political circles ).

    विरोधी पक्षनेते यांनी या खुर्ची देण्याच्या घटनेचा वेगवेगळा अर्थ काढला. याबाबत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याबाबत खुलासा करीत एखादा जेष्ठ आणि वयोवृद्ध सर्वसामान्य माणूस जरी आला तरी त्याला बसण्यासाठी आपण खुर्ची देतो. तो मोठा आहे म्हणून नाही. तर त्याच्यात असलेल्या संस्कृतीचा हा भाग असल्याचे आव्हाड म्हणाले.

    शरद पवार सारखे वयोवृद्ध नेते आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणणे ही लगबग म्हणजे संजय राऊत यांच्यात असलेली माणुसकी आणि त्यांच्यावर घडलेले संस्कार याचे दर्शन आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर सर्वजण मंत्रीमहोदय उभे राहतात. कारण ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेले सन्मानीय पदाला मान देण्याची संस्कृती आहे. संजय राऊत यांनी जे काही केले. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी त्यांच्यातील संस्कृती दाखविली असा खुलासा आव्हाड यांनी केला.