BJPs orange flag is fake Sanjay Rauts harsh criticism

भाजपाला टीका करण्यासाठी भारतरत्न(bharat ratn to bjp for criticizing) दिला पाहिजे, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत (sanjay raut press conference)लगावला आहे.

भाजपाला टीका करण्यासाठी भारतरत्न(bharat ratn to bjp for criticizing) दिला पाहिजे, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत (sanjay raut press conference)लगावला आहे. भाजपाचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात त्यामुळे त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. तसेच काही लोकांना तर पीएचडीची पदवी दिली पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.

तीन पक्ष एकत्र कधी लढतील मी वाट बघतोय आम्ही लढायला तयार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्याबद्दल संजय राऊत  म्हणाले, विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत आम्ही एक छोटी लढाई केली आणि ती जिंकलो. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्रच होते. त्यामुळे पुढेही ते एकत्रच असतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.