मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांची भेट घेतल्यानंतर आता ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sanjay Raut Meeting With sharad pawar) यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले आहेत.

    मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांची भेट घेतल्यानंतर आता ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sanjay Raut Meeting With sharad pawar) यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut Meeting) आज दुपारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले. दोन दिवसांत दोनदा उद्धव ठाकरे यांच्याशी संजय राऊत यांनी महत्वाची चर्चा केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल झाले. लागोपाठ दोन बैठकांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

    संजय राऊत यांनी याआधीही शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला होता. तेव्हा संजय राऊत दिल्लीला जाऊन शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पुन्हा एकदा भेटीचे चर्चासत्र सुरू झाले आहे.

    रविवारीच शरद पवार यांनी आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही. जर काही अडचणी असतील तर त्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करता आणि यावर तोडगा काढतात. त्यामुळे हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला होता. दुसरीकडे, संजय राऊत यांनी ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असून मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे राहणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. पण, आता पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झाले आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.