Sanjay Raut's efforts to quell resentment between Chief Minister Uddhav Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील पत्राचारामुळे दोन्ही नेत्यांमधील ताणलेल्या नात्यामध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महत्वाची माहिती समोर आली आहे(Sanjay Raut's efforts to quell resentment between Chief Minister Uddhav Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari).

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील पत्राचारामुळे दोन्ही नेत्यांमधील ताणलेल्या नात्यामध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महत्वाची माहिती समोर आली आहे(Sanjay Raut’s efforts to quell resentment between Chief Minister Uddhav Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari).

  राज्यपालांना धुडकावून विधिमंडळात कामकाज न करण्याचा सल्ला आघाडीचे सरकारचे नेते शरद पवार यांनी दिला असतानाच शिवसेनेचे संकटमोचक हनुमान खा संजय राऊत यानी काल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात आलेल्या राज्यपालांना गाठून त्यांच्या समोर रदबदली केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी देखील माध्यमांमध्ये काल राज्यपालांची भेट झाली आणि चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

  खा संजय राऊत याच्याकडून राज्यपालांची रदबदली

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उध्दव ठाकरे यांचे बंधु बिंदूमाधव ठाकरे यांच्या मुलाचे लग्न भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येसोबत काल झाले, या सोहळ्यात आशिर्वाद देण्यासाठी पोहोचलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत खा संजय राऊत यानी अप्रत्यक्षपणे राज्यपालांच्या सोबत ताणलेले संबंध सुधारण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर बाबीवर अभ्यास करून गुरूवारी ज्येष्ठ मंत्र्यानी त्यांच्या प्रश्नाची  उत्तरे घेवून निवेदन देण्यासाठी राजभवनावर जाण्याचे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार राज्य सरकारने बुधवारी या संदर्भात पत्राचा वैधानिक प्रतिवाद करण्याचे मुद्दे तयार केले असून हे निवदेन मंत्रिमंडळ बैठकी पूर्वी अथवा बैठकीनंतर राज्यपाल़ची भेट घेवून त्यांची मनधरणी केली जाण्याची शक्यता आहे.

  राज्यपाल राजी होतील, तेव्हा निवडणुकीची प्रक्रिया

  दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, सरकार सल्ला दिल्यानंतर त्याप्रमाणे राज्यपालांनी निर्णय घेतला पाहिजे. विधिमंडळ सर्वोच्च आहे. यात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे राज्यपाल जेव्हा या प्रक्रियेला राजी होतील, तेव्हा अध्यक्षपदाबाबतच्या निवडणुकीची प्रक्रिया होईल.

  राज्यपालांचा मान राखण्यासाठी थांबलो आहोत

  राज्यपालांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘ राज्यपालांना कोणते शब्द आवडले नाही मला माहित नाही. या प्रक्रियेत मतभेद आहेत हे विचाराचे मतभेद आहेत. आम्ही जो नियमांमध्ये बदल केला तो योग्य केला. ज्या पद्धतीने लोकसभेत अध्यक्षाची निवड होते त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेत केली आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करतात तशीच शिफारस मुख्यमंत्री राज्यपालांकडे करतात. घटनात्मक चूक आम्ही केली नाही. राज्यपाल म्हणतात, मला घटनात्मक चूक वाटते. मात्र आम्ही कायदेशीर प्रक्रिया करत आहोत, राज्यपालांचा मान राखण्यासाठी आम्ही थांबलो आहोत.

  ‘राज्यपाल राजी होतील, अनुमती देतील तेव्हा निवडणूक होईल. आम्हाला, सरकारला असं अपेक्षित आहे की, राज्यापालांनी राज्य घटनेप्रमाणे निर्णय घेतले पाहिजेत. विधानपरिषदेच्या १२ जागांच्या बाबत राज्यपालांना भेटलो, पत्र दिली गेली, स्मरणपत्र दिली. भेटून आवाहन केलं. आता त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, अशी आशा करतो.

  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई