प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मोजक्यात शब्दांत आपली प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचे टाळलं. सरनाईक यांनी मत मांडले त्यावर प्रतिक्रिया द्यावे, असं काय आहे. मुळात विनाकरण त्रास दिला जात आहे, असं ते म्हणतात विनाकरण कोण त्रास देतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.

  मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देत ‘विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधलं पाहिजे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  राऊत काय म्हणाले ?

  दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मोजक्यात शब्दांत आपली प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचे टाळलं. सरनाईक यांनी मत मांडले त्यावर प्रतिक्रिया द्यावे, असं काय आहे. मुळात विनाकरण त्रास दिला जात आहे, असं ते म्हणतात विनाकरण कोण त्रास देतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.

  तसंच, या पत्रातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. विनाकारण महाविकास आघाडीतील नेत्यांना कोण त्रास देतंय याचा विचार केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

  सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

  सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी पत्रात केल्याचं कळतंय. युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केल्याची माहिती आहे.