त्यात चुकीचे काय? गृहमंत्र्यांना ‘आम्हीदेखील’ भेटू शकतो, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया

देशातील एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेत असेल, तर गैर काय, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. देशाच्या गृहमंत्र्यांची शरद पवारांनी जरी भेट घेतली असेल, तर त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे आणि आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. देशाच्या गृहमंत्र्यांची कुणीही भेट घेऊ शकतो, आम्हीदेखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलंय. 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या भेटीतून शिवसेनेला इशारा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केल्याची सांगितलं जातंय. तर शिवसेनेनंही यावर आता प्रतिक्रिया देत या भेटीकडं आपण फारशा गांभिर्यानं पाहत नसल्याचं दाखवून दिलंय.

    देशातील एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेत असेल, तर गैर काय, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. देशाच्या गृहमंत्र्यांची शरद पवारांनी जरी भेट घेतली असेल, तर त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे आणि आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. देशाच्या गृहमंत्र्यांची कुणीही भेट घेऊ शकतो, आम्हीदेखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलंय.

    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. विशेषतः अगोदर सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयु्क्त परमबीर सिंग यांनी टाकलेला लेटर बॉम्ब यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेमुळे वेगळ्या शक्यतांची चर्चाही सुरु झालीय.

    या भेटीबाबत विचारणा केली असता, सगळ्याच गोष्टी सार्वजनिक करता येऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शाह यांनी दिलीय. त्यामुळे भेट झाली होती की नव्हती, याचं कुठलंही स्पष्ट उत्तर न देता त्यांनी संभ्रमात अधिकच भर घालणं पसंत केल्याचं चित्र निर्माण झालंय. अशी भेट झालीच नव्हती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक केला होता. मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी वेगळं विधान करून गोंधळात भर टाकलीय.