फडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्याला संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले की…

२०१४ साली धनगर समाजाच्या आरक्षासंदर्भात सुद्धा भाजपने अशाच प्रकारचं विधान बारामतीमध्ये केल्याचं मला आठवतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. आरक्षणाच्या विषयाचं राजकरण करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओबीसी समजाचे प्रमुख नेते छगन भुजबळ,. अजित पवार हे सगळे यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आज जे सत्तेत आहेत त्यांची विरोधी पक्ष असताना वेगळी भुमिका नव्हती. विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांचं देखील ते कर्तव्य आहे. महाराष्ट्रातल्या या वंचित समाजाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. त्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे असं नाही, असं संजय राऊत यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.

    मुंबई : माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला हाणला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळातही रस्त्यावर उतरून करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

    संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं ?

    २०१४ साली धनगर समाजाच्या आरक्षासंदर्भात सुद्धा भाजपने अशाच प्रकारचं विधान बारामतीमध्ये केल्याचं मला आठवतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. आरक्षणाच्या विषयाचं राजकरण करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओबीसी समजाचे प्रमुख नेते छगन भुजबळ,. अजित पवार हे सगळे यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आज जे सत्तेत आहेत त्यांची विरोधी पक्ष असताना वेगळी भुमिका नव्हती. विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांचं देखील ते कर्तव्य आहे. महाराष्ट्रातल्या या वंचित समाजाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. त्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे असं नाही, असं संजय राऊत यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

    पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.