Even Fadnavis had used threatening language when he was the Chief Minister Criticism of Sanjay Raut

गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या लोकांकडून गोव्यात नोटांचा पाऊस पाडला जात आहे. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगाच्या-बॅगा भरून गोव्यात पाठवल्या जात आहेत, तरीही हिंदुत्ववादी नोटांना पुरून उरतील, असे ते म्हणाले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या निवडणुकीवरून एक विधान केले होते. त्यावरच शिवसेना खासदारांनी उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशातही सत्तांतर अटळ आहे असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात जनमत विकल्या गेला तसे आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असे फडणवीस म्हणाले होते त्यावर राऊत यांनी पलटवार केला(Sanjay Raut's retaliation against Devendra Fadnavis).

  मुंबई : गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या लोकांकडून गोव्यात नोटांचा पाऊस पाडला जात आहे. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगाच्या-बॅगा भरून गोव्यात पाठवल्या जात आहेत, तरीही हिंदुत्ववादी नोटांना पुरून उरतील, असे ते म्हणाले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या निवडणुकीवरून एक विधान केले होते. त्यावरच शिवसेना खासदारांनी उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशातही सत्तांतर अटळ आहे असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात जनमत विकल्या गेला तसे आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असे फडणवीस म्हणाले होते त्यावर राऊत यांनी पलटवार केला(Sanjay Raut’s retaliation against Devendra Fadnavis).

  गोव्यात आमची लढाई नोटांशीच आहे. भाजपाचे लोक निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडत आहेत. अशात शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल. तसेच गोव्यातील जनतेला सांगण्याचा प्रयत्न करेल की या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू असे राऊत म्हणाले.

  भाजपावर हल्लाबोल

  फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष फुटला हे आपण पाहिलेच असेल. कालच एका मंत्र्यांनी पक्षत्याग केला आणि भाजप आमदार प्रवीण झाटे यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे, फडणवीसांनी आधी आपल्या पक्षात सुरू असलेले युद्ध पाहावे, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला.

  उप्रत सत्ता परिवर्तन होणारच

  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवरूनही राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. काही ओपिनिअन पोलमध्ये भाजप उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेवर येईल असे सांगितले जात आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा. परंतु, सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे, असे भाकित त्यांनी वर्तवले.

  शरद पवार यांची उंची मोठीच

  शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडे आहेत, त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही, असे राऊत म्हणाले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022