नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, 6 शस्त्रधारी जवानांचं सुरक्षा कवच

संजय राऊत यांची सुरक्षा वाढवल्याने सध्या त्यांच्या रक्षणासाठी सहा शस्त्रधारी जवान तैनात करण्य़ात आल्याने त्यांच्या घराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

  मुंबई : केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व शिवसेना हा वाद काही अजून शांत झालेला नाही. कधी राणेंचे दोन चिरंजीव शिवसेनेवर टीका करतात तर कधी शिवसेना सामनातून टीका करत असते. त्यातच निलेश राणे यांनी संजय राऊतांना करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिल्याने राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

  संजय राऊत यांची सुरक्षा वाढवल्याने सध्या त्यांच्या रक्षणासाठी सहा शस्त्रधारी जवान तैनात करण्य़ात आल्याने त्यांच्या घराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

  वाय ‘Y’ दर्जाची सुरक्षा

  संजय राऊत यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून आता राऊत यांच्या ताफ्यात SPU चे दोन अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या (SPU) एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे.

  बंधू आमदार सुनिल राऊत यांची सुरक्षा वाढवली

  संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्याही सुरक्षेत करण्यात येणार आहे. सुनिल राऊत यांना देखील वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. झोन-७ चे उपायुक्त प्रशांत कदम आणि सुनील राऊत यांच्यात सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक होत असून त्यांची सुरक्षाही वाढवली जाणार आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  केंद्रीय मंत्री राणे यांची जन आशिर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यात आली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पत्रकार परिषदेत राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली खेचण्याची भाषा वापरली होती. त्यामुळे ‘हा एका घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान असल्याचं कारण देत संतप्त शिवसैनीकांनी राणेंविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हे दाखल केले. गुन्ह्यांची दखल घेत रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली व दोनच तासात महाड न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.

  या दरम्यान, राणे पीता पुत्र आणि राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु होते. एकमेकांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.