…तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता, तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? आपण हिंदुत्ववादी म्हणून आमच्यासोबत पाच वर्षे मुख्यमंत्री होतात ना?असा सवाल राऊतांनी केला आहे(Sanjay Raut's strong retaliation against Devendra Fadnavis).

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता, तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? आपण हिंदुत्ववादी म्हणून आमच्यासोबत पाच वर्षे मुख्यमंत्री होतात ना?असा सवाल राऊतांनी केला आहे(Sanjay Raut’s strong retaliation against Devendra Fadnavis).

    एखाद्या शहराचे नाव बदलायचे असेल, तर केंद्र सरकारची परवानगी लागते. केंद्र सरकारने त्याला परवानगी द्यावी लागते आणि मागील काही वर्षांपासून सरकार त्यासाठी केंद्रकडे प्रयत्न करत आहे. केंद्राने त्याला मंजुरी का दिली नाही? हे विचारावे लागेल. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री असताना आपल्याला असे का वाटले नाही?, असा प्रतिप्रश्न राऊत यांनी फडणवीसांना केला.

    उत्तरप्रदेशच्या योगींनी अलाहाबादचे प्रयागराज करून घेतले. तसे फडणवीसांनी औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? आम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाच सांगून टाकले की, संभाजीनगर झाले म्हणून आणि आमच्या हिशोबाने ते झालेले आहे. राम मंदिराचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही. कोर्टाने सोडवला आहे. त्यानंतर तेव्हाचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी खासदार करण्यात आले असे संजय राऊत म्हणाले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022