सातारचा प्रसाद चौगुले राज्यसेवेत पहिला; रोहन कुवर मागासवर्गीयात तर मानसी पाटील मुलींमध्ये पहिली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौगुले हा सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम आला आहे. रोहन कुवर हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. एमपीएससीने या सदंर्भात परिपत्रक जारी केले आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 4२० पदांचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौगुले हा सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम आला आहे. रोहन कुवर हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. एमपीएससीने या सदंर्भात परिपत्रक जारी केले आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 4२० पदांचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    राज्य सेवा आयोगाने एकूण 420 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.  या परीक्षेच्या माध्यमातून उप जिल्हाधिकारी , तहसीलदार,  नायब तहसीलदार,  पोलीस उपअधिक्षक अशी वेगवेगळी 26 प्रकारची पदे भरली जाणार आहेत.

    एमपीएससी 4२० पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता.

    10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीने देण्यात आल्यानंतर आयोगाने निकालाविषयी भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र दिले होते.