‘सत्यपाल मलिक जाट आहेत आणि जाट बंडखोर असतो’ सामनातुन मालिकांची पाठराखण

राज्यपाल मलिक यांनी आता असे म्हटले आहे की, “मोदी हे प्रचंड अहंकारी गृहस्थ आहेत.’’ सत्यपाल मलिक यांनी यात नवीन असे काय सांगितले? पण मलिक पुढे सांगतात ते महत्त्वाचे. शेतकरी आंदोलन संपवा, आतापर्यंत 500 शेतकरी मरण पावले आहेत, असे सांगण्यासाठी आपण मोदींना भेटलो तेव्हा त्यांचा प्रतिसाद बरा नव्हता. ‘‘माझ्यासाठी ते 500 शेतकरी मेलेत काय?’’ असा उलटा प्रश्न मोदी यांनी केला तेव्हा आपले व त्यांचे भांडण झाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. खरेखोटे मोदीच जाणोत. मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, कार्यपद्धती कशी आहे ते काही लपून राहिलेले नाही. मोदींचे भक्त अनेक आहेत, पण मोदी स्वतःचेच भक्त आहेत. स्वभक्ती आली की अहंकार हा आलाच.

  सत्यपाल मलिक हे गोव्याचे राज्यपाल होते. तेथील सरकारच्या भ्रष्टाचाराची त्यांनी पोलखोल केली. तेव्हा त्यांची पाठवणी मेघालयात करण्यात आली. एक महत्त्वाची फाईल मंजूर करण्यासाठी संघ परिवारातील प्रमुख नेत्याने 300 कोटींची लाच देण्याचा कसा प्रयत्न चालविला होता याचाही स्फोट मलिक यांनी केला. मोदींच्या अहंकारावर त्यांनी आता हल्ला केला आहे. तसे ते बेडर दिसतात, परिणामांची पर्वा करताना दिसत नाहीत. सत्यपाल मलिक हे ‘जाट’ आहेत व ‘जाट’ बंडखोर असतो ते या निमित्ताने दिसले. असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामतून सत्यपाल मलिक यांनी पाठराखण करण्यात आली आहे.

  काय म्हटलंय सामानात?

  मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प. बंगालचे राज्यपाल जगदीश धनकड यांच्याप्रमाणे राजभवनात बसून ते राजकारण करतात की नाही याबाबत शंका आहे, पण राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिका आणि विधाने वाद ओढवून घेणारी ठरली आहेत.

  जम्मू-कश्मीर, गोवा, मेघालय अशा राज्यांत ते होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वाद ओढवून घेतले. सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत. राज्यपाल मलिक यांनी आता असे म्हटले आहे की, “मोदी हे प्रचंड अहंकारी गृहस्थ आहेत.’’ सत्यपाल मलिक यांनी यात नवीन असे काय सांगितले? पण मलिक पुढे सांगतात ते महत्त्वाचे. शेतकरी आंदोलन संपवा, आतापर्यंत 500 शेतकरी मरण पावले आहेत, असे सांगण्यासाठी आपण मोदींना भेटलो तेव्हा त्यांचा प्रतिसाद बरा नव्हता.

  ‘‘माझ्यासाठी ते 500 शेतकरी मेलेत काय?’’ असा उलटा प्रश्न मोदी यांनी केला तेव्हा आपले व त्यांचे भांडण झाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. खरेखोटे मोदीच जाणोत. मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, कार्यपद्धती कशी आहे ते काही लपून राहिलेले नाही. मोदींचे भक्त अनेक आहेत, पण मोदी स्वतःचेच भक्त आहेत. स्वभक्ती आली की अहंकार हा आलाच. मोदी यांनी शेतकऱयांचे आंदोलन चिघळू दिले. त्यात पाचशेहून अधिक शेतकऱयांचे बळी गेले तरी ते काळे कायदे माघारी घ्यायला तयार नव्हते. हा अहंकारच होता. मलिक यांनी तेच सांगितले.

  मेघालयचे राज्यपाल हे मूळचे भाजपचे किंवा संघ परिवाराचे नाहीत. ते जाट नेते, समाजवादी विचारांचे आहेत. त्यामुळे शिस्त वगैरे गोष्टींशी त्यांचा संबंध नसावा. अशा समाजवादी विचारांच्या नेत्यास मोदी यांनी राज्यपाल केले याचा काय अर्थ घ्यायचा? आता राज्यपाल पदाची मुदत संपताना राज्यपालांच्या मनगटातील जाटपण उसळून आलं आहे.

  सत्यपाल मलिक हे गोव्याचे राज्यपाल होते. तेथील सरकारच्या भ्रष्टाचाराची त्यांनी पोलखोल केली. गोवा सरकार जागोजाग भ्रष्टाचार करीत असल्याचे फटाके त्यांनी फोडले, तेव्हा त्यांची पाठवणी मेघालयात करण्यात आली. जम्मू-कश्मिरात राज्यपाल असताना एक महत्त्वाची फाईल मंजूर करण्यासाठी संघ परिवारातील प्रमुख नेत्याने 300 कोटींची लाच देण्याचा कसा प्रयत्न चालविला होता याचाही स्फोट मलिक यांनी केला. त्याच फटाक्यांची माळ घेऊन मलिक वावरत असतात. त्यांच्या नावात ‘सत्य’ आहे. मोदींच्या अहंकारावर त्यांनी आता हल्ला केला आहे. तसे ते बेडर दिसतात, परिणामांची पर्वा करताना दिसत नाहीत. सत्यपाल मलिक हे ‘जाट’ आहेत व ‘जाट’ बंडखोर असतो ते या निमित्ताने दिसले.