४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार, शिक्षण विभागानं पाठवलेला प्रस्ताव मंजूर

येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा (School Reopen) सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत.

  मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भामुळे (Corona Virus)  राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु  येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा (School Reopen) सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत.

  शिक्षण विभागाने (school dept) मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. मध्यंतरी ग्रामीण भागातील (village school) शाळा सुरु झाल्या होत्या. पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. विद्यार्थी मागच्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. १७ ऑगस्टला शाळा सुरु करण्याचा मानस होता. पण तो निर्णय रद्द झाला होता.

  दरम्यान, बहुतांश ठिकाणी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. तसेच शिक्षकांचं देखील लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शिक्षण खात्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

  ४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू करता येणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

  – शहरी भागात 8 वी ते बारावीचे वर्ग सुरू होणार तर ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार
  – प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न
  – विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एसओपी तयार करणार
  – शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नाही.
  – उपस्थिती सक्तीची नाही, पालकांची संमती आवश्यक
  -स्थानिक प्रशासनाकडे सर्व अधिकार
  -निवासी शाळांबाबत निर्णय नाही