
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही दरवाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर १०० च्या पार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पातून पेट्रोल-डिझेलसह कृषी क्षेत्रात देखील नवीन योजना आणणार असून शेतकरी अल्पभूधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आज (सोमवार) दुपारी २ वाजता सादर केला जाणार आहे. यामध्ये राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तसेच आज महिला विशेष दिन असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कोणती घोषणा करणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
१ फेब्रुवारीला केंद्र सरकारकडून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आलं होतं. परंतु केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांवर महाविकास आघाडीतून हल्लाबोल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या योजनांवर टीकात्मक भाष्य देखील केलं होतं. आज राज्याचा अर्थसंकल्प राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळणार की हवेत नुसताच गोळीबार होणार याकडे विरोध पक्षनेत्यांचं लक्ष लागलं आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमध्ये कपात होणार ?
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक उदयोगधंदे देखील बंद पडले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही दरवाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर १०० च्या पार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पातून पेट्रोल-डिझेलसह कृषी क्षेत्रात देखील नवीन योजना आणणार असून शेतकरी अल्पभूधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.