कोरोनाकाळात घराबाहेर पडणेही धोकादायक असताना स्वत:मैदानात उतरून काम केले; महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळाची द्वितीय वषर्पूर्ती

मुंबईच्या महापौरपदाची धुरा दोन वर्षापूर्वी खांद्यावर घेतल्यानंतर किशोरी पेडणेकर यांचा कार्यकाळ यशस्वी कोविड लढा आणि मुंबईच्या विकासाला प्राधान्य देणारा ठरला आहे. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये घराबाहेर पडणेही धोकादायक असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:मैदानात उतरून पालिका प्रशासनासोबत काम केले. यशस्वी कोविड लढयासोबत मुंबईच्या विकासालाही प्राधान्य देण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यामुळे त्याच्या कार्यकाळाची दोन वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाल्याबदल त्यांच्या कार्याचा गौरव मुंबईकरांनी केला(Second year of Mumbai Mayor Kishori Pednekar's tenure ).

    मुंबई : मुंबईच्या महापौरपदाची धुरा दोन वर्षापूर्वी खांद्यावर घेतल्यानंतर किशोरी पेडणेकर यांचा कार्यकाळ यशस्वी कोविड लढा आणि मुंबईच्या विकासाला प्राधान्य देणारा ठरला आहे. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये घराबाहेर पडणेही धोकादायक असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:मैदानात उतरून पालिका प्रशासनासोबत काम केले. यशस्वी कोविड लढयासोबत मुंबईच्या विकासालाही प्राधान्य देण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यामुळे त्याच्या कार्यकाळाची दोन वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाल्याबदल त्यांच्या कार्याचा गौरव मुंबईकरांनी केला(Second year of Mumbai Mayor Kishori Pednekar’s tenure ).

    मुंबई महानगरपालिकेत ९७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांना महापौर पदाची संधी मिळाल्यानंतर काही महिन्यांतच मार्च २०२० मध्ये कोरोनाने मुंबईत शिरकाव केला.काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटयाने वाढू लागली. कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यामतून केल्या जाणा‍ऱ्या उपाययोजनांचा त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला.यामध्ये त्यांना स्वत:लाही कोरोनाची लागण झाली. मात्र यावर त्यांनी मात करून पुन्हा लढाई सुरू केली.

    रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे जादा बिल, कोविड चाचण्यांसाठी लॅबकडून आकारण्यात येणारे जादा बिल कमी करण्यासाठी आणि अशा मुजोर लोकांना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना लढयासह मुंबईच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. लसीचा साठा करण्यासाठी कांजूरमार्ग येथे सुरू केलेल्या कोल्ड स्टोरेज सेंटरचा आढावा घेतला.

    विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, त्यांची व्यवस्था कोणत्या प्रकारे होते यावर लक्ष ठेवले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्याशी चर्चा करून कोविड योद्धा चतुर्थ श्रेणी कामगारांचा यथोचित सन्मान केला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी चर्चा करून कूपर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावला.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी समन्वय साधून वेळोवेळी काम केले.

    पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदशर्नाखाली आगामी ५०वर्षाची गरज पूर्ण करणाऱ्या कोल्ड स्टोरेज सेंटर अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.दरम्यान महापौरांनी अशा कठिण परिस्थीतीतही चांगले काम करून कोविडशी लढा दिला.त्याचबरोबर त्यांनी मुंबईच्या विकासाठी मेहनत घेतली.त्यांना यासाठी पालिका प्रशासन आणि त्यांच्या सहकारयांची देखील मोलाची साथ मिळाली.