
सध्या राज्यातील 'ओमिक्रॉन' बाधितांची संख्या 17 झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक 'ओमिक्रॉन' बाधित रुग्ण राज्य बनलं आहे. ३० हून अधिक संशयित रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल येणे बाकी आहे. नवीन बाधितांमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. संपूर्ण मुंबई शहरात दोन दिवस जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे. या काळात मोठमोठे मेळावे, रॅली आणि निषेध मोर्चांवर बंदी असेल. पोलिस उपायुक्तांनी जारी केलेला आदेश शनिवारपासून लागू होणार असून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
मुंबई : शुक्रवारी कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले ७ नवीन रुग्ण आढळल्याने सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामध्ये ३ मुंबईतील तर ४ जण पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील आहेत. सध्या राज्यातील ‘ओमिक्रॉन’ बाधितांची संख्या १७ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक ‘ओमिक्रॉन’ बाधित रुग्ण राज्य बनलं आहे. ३० हून अधिक संशयित रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल येणे बाकी आहे. नवीन बाधितांमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
याच पार्श्वभुमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.
ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. याआधी ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूमुळे जमावबंदीसारखे निर्बंध अकोला जिल्ह्यात लावण्यात आले होते.
दरम्यान, संपूर्ण मुंबई शहरात दोन दिवस जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. या काळात मोठमोठे मेळावे, रॅली आणि निषेध मोर्चांवर बंदी असेल. पोलिस उपायुक्तांनी जारी केलेला आदेश शनिवारपासून लागू होणार असून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.