sudhir joshi

ज्येष्ठ शिवसेना नेते माजी मंत्री सुधीर जोशी  (Sudhir Joshi In Critical Condition) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत जसलोक रूग्णालयात दाखल (Sudhir Joshi Admiited To Jaslok Hospital) करण्यात आले आहे.

    मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून जोडले गेलेले ज्येष्ठ शिवसेना नेते माजी मंत्री सुधीर जोशी  (Sudhir Joshi In Critical Condition) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत जसलोक रूग्णालयात दाखल (Sudhir Joshi Admiited To Jaslok Hospital) करण्यात आले आहे. सुधीर जोशी यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    महसूल आणि शालेय शिक्षण खात्यांचे मंत्री राहिले
    सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासु सहकारी मानले जातात. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांनी  अनेक दिवस स्थानिय लोकाधिकार समितीत काम पाहिले. युती सरकारच्या काळात ते महसूल आणि शालेय शिक्षण या महत्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले आहेत. सन १९९८मध्ये त्यांच्या कारला झालेल्या भिषण अपघातातून ते बचावले होते. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानाने आणि प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव संघटनात्मक कामापासून दूर झाले होते.